
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रशांत सर
लाभो तुम्हा आयुष्य
उदंड आणि छान
तुमच्या शब्दांना मिळो
प्रत्येक क्षेत्रात मान।।
पत्रकार होऊन तुम्ही
सामाजिक कार्य केले
प्रत्येक गुप्त गोष्टीला
समाजासमोर नेले।।
निर्भड होऊन समाजात
जगावे तुम्ही छान जीवन
मिळत राहो यश असेच
यावेत नेहमी सुखाचे क्षण।।
प्रबोधिनी न्यूज नेटवर्कचे
सर्वत्र जाळे तुम्ही पसरवले
ज्ञानरुपी कवितेला खरोखर
महान तुम्हीच बनविले।।
साहित्याच्या क्षेत्रात ही
नाव कमविले छान
नव कवी कवयित्रीला
देतात तुम्ही मान।।
वाढत जावे आयुष्य
चंद्र सूर्याच्या सारखे
जीवनात कोणतेही सुख
नको व्हायला कधी पारखे।।
सुख समृद्धी आपणास मिळो
हीच आमुची मनोमन इच्छा
व्हावे तुमचे मनोरथ ही पूर्ण
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा।।
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर














