Home कविता आजची कविता-  स्त्री जन्मा तुझी कहाणी

आजची कविता-  स्त्री जन्मा तुझी कहाणी

0
163

आजची कविता-  स्त्री जन्मा तुझी कहाणी

तू आहे सावित्रीची लेक
नको करू आयुष्यात निर्विवेक
तू रहा खंबीर त्या आईप्रमाणे
नको शस्त्र हाती घे लेखणी सद्विवेक

रमाईची तू लेक सबला
तिने दिला ग बाबा सारखा
मजबूत अंगरखा मग का करते
हरु नकोस पेटव मशाल उन्नतीचा

जिजाऊ सारखी तेज तर्रार
आईचे आहे उपकार सर्वांसाठी
तिने दिला शिवबा सारखा प्रहार
घे हाती जिजाऊ चे पाऊल तुझ्यासाठी

झलकारी बाई रणांगणा
वीर चन्नम्मा ओनके ओबवा वीर
या रणांगणाच होत्या शूरवीर नारी
मग का कमी पडावे नारी शक्ती अधीर

लढाई तुझ्या अस्तित्वाची
लढावे लागेल तुलाच नाही येणार
कोणी देवदूत किंवा नाही कोणी
 खंबीर होउनी घ्यावे स्वतःचे कैवार

कवियत्री रंजना भैसारे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here