
आजचा लेख – स्री जन्मा तुझी कहाणी
स्री जन्मा तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी.स्री म्हणजे असते घराचा कणा तीच्या शिवाय घर चालेना.
पहाटेच उठून कामाला लागणार, सगळ्यांना नाश्ता,डबे वेळेवर देणार.मोठ्या माणसाची काळजी घेणारी.आजारपणात रात्र रात्र जागणारी आई असते.प्रियकरासाठी व्याकूळ होणारी प्रेयसी असते.भावाची लाडकी बहिण होते.जोडीदाराची साथीदार बनून त्याच्या सुखदुःखाच्या क्षणी सदैव सोबत असते.मुलांना सुसंस्कृत करण्यात तीचे मोलाचे योगदान आहे.
आपल्या देशाचा इतिहास बघता कित्येक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या.अहिल्यबाई होळकर,राणी दुर्गावती, झाशीची राणी, इंदिरा गांधी. सावित्रीबाई फुले, रमाई, यांचे नाव इतिहासात अजरामर आहे.दु:खातही त्यांनी कष्टाची पर्वा केली नाही.स्रियांच्या उद्धारासाठी त्यांनी अविरत कार्य केले.
एवढे सारे कार्य करुनही स्री ला दुय्यम स्थान दिले जात होते.तिला शिक्षणाचा, संपत्तीचा कोणताही अधिकार नव्हता.चुल आणि मुलं एवढेच तीचे कार्यक्षेत्र होते.परंतू सावित्री, ज्योती, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम स्त्रियांच्या आयुष्यात प्रकाश पेरला.त्या शिक्षण घेऊ लागल्या.संपत्तीचा अधिकार त्यांना मिळाला.प्रत्येक क्षेत्रात स्री आघाडीवर आहे.
ती आकाशात झेप घेते, समुद्राच्या तळाशी जाऊन मोती शोधून आणते.
डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षीका,नर्स होऊन देशाची सेवा करते.
शेतीचे काम करुन अखिल मानवजातीच्या हितासाठी ती झटत असते.हार तीला माहीत नाही.लोकांना जगने शिकवते.
बंधुंनो तुम्हाला कळकळीची विनंती आहे.तीच्याकडे उपभोगाची वस्तू म्हणून बघू नका.कोवळ्या कळ्यांना कुस्करून टाकू नका,उमलू द्या कळ्यांना.बहारदार बाग फुलून येईल.सृष्टी आनंदाचे गीत गाईल.
कवियत्री- शोभा वेले, नागपूर














