तथागताची वाणी असे गोड
राग मनातून नष्ट करी
ऐकावी त्यांची सुंदर वाणी
त्यात जीवनाची सत्यता खरी
केले छान उपदेश मानवास
सत्यतेचा दाखवला प्रकाश
शांतता ठेवा आपल्या मनी
वाईट मार्गाचा होईल नाश
सुखी कोणी नाही जगी
हे दाखवले या जगास
दुःख मना मध्ये ठेवू नका
जाईल दुःखाचा हा दिवस
चांगले विचार सांगूनी लोकांस
सुधारणा झाली या समाजात
अशी श्रेष्ठ बुद्धांची ही वाणी
असावी लोकांच्या कर्माकर्मात
कवियत्री ऋतुजा आहिरे
पुण्यश्लोक अहिल्यानगर

