माझ्या मन मंदिरात असे तू
राहतोस माझ्या रोमारोमात
तुझेच नाव घेत असते सदा
माझ्या जगण्याच्या ह्या श्वासात
सारे काही फिके पडतात
हिऱ्यामोत्याचेही दुकान
तुझ्या जिवापाड प्रेमातच
आहे जगण्याचे तत्वज्ञान
हृदयात कोरलेले आहे
माझ्या फक्त तुझे नाव
तुझ्या विना नाही मला
कुठलेही नाव गाव ठाव
रमणीय या मधुबनाचा
सख्या आहेस बागवान
तुझ्या मुळे जगण्याला
अर्थ आला आहे महान
कसलीही कमतरता नाही
असतोच सदा भोवताली
तुझ्या विना नाही कुठे
जीवलग कोणी वाली.
कवियत्री शोभा वेले, नागपूर

