मन मंदिरात तू
सहवास माझा तूच रे
श्वास हा तूच रे
मन माझं तूच रे
जीवन सार तूच रे
जीवनात या तूच तू
या मन मंदिरात तूच तू
जीवनातली दाही दिशा तू
जगण्याच पाऊल तू
तूच माझी जिद्द तू
तूच माझा हट्ट रे
या मन मंदिरात तू रे
मि फुल तूच माझा सुगन्ध रे
तूच नभ मि त्या
नभाची चंदणी रे
तूच शान ग
या मन मंदिराची
या मनाचा गाभारा हा
या गाभारतील कान्हा तूच रे
मि याचं कान्हाची राधा रे
मि याच कान्हाची राधा रे
या मन मंदिरात तू रे
कवियत्री तृप्ती वाव्हळ
ता. शिरूर, जि.पुणे

