घडवितो नव्या बालकांना सदा
कुंभारापरी देई मुलांना आकार
म्हणूनच म्हणतात सारे शिक्षकांना
भावी पिढीचा असतोय शिल्पकार
सुसंस्काराचे धडे शिकवितात
वेळ प्रसंगी शिक्षा सुद्धा करतात
नित्तीमत्तेचे अनमोल शिक्षण
बालमनावर नेहमी कोरतात
डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ
साहित्यिक,गायक, कलाकार
शिक्षक असतोय मार्गदर्शक
म्हणूनच सारेच घेती आकार
कौतुकाचे दोन शब्द त्यांचे
नव्या दिशा देणारे ठरतात
रागावले जरी आपल्यावर
यशाचे तेच बीज पेरतात
विश्वाचा अधिपती गुरु आम्हा
नव्याने नवनिर्मितीची दिशा देतो
नवे स्वप्न रोज साकार करण्यास
नव्याने रोज नविन दिवस येतो.
कवयित्री शोभा वेले, नागपूर

