भाद्रपद चतुर्थीला
गणराया तु येतो.
सूखसमृद्धीचा घडा
देऊनीया जातो.
तु येतोस तेव्हा
सगळीकडे आनंद.
सगळ्यांनाच कसा रे
देवा तुझा छंद.
एक माझं गुपित,
सांगते तुला ऐक
दिलेस मला दान
शंभर पटीने कैक.
अजुन वाटतं होत
स्त्रीयां आहेत सुरक्षित.
पण दररोज बातमी येते
नराधमानी केल्या भक्षित.
किती माजला व्यभिचार,
खुडल्या जातात नाजुक कलीका
तुच थांबव आता सारे,
वाचव आमच्या छोटुल्या बालीका.
त्यांच्या आगमनाने फुलुन
जाते घर आणि अंगण,
अजाण त्या बाहुल्या
आमच्या शरीराचे वंगण.
आता तु येतोच आहे तर
फिरव जादुची कांडी
निच नराधम राक्षसांची
जाळुन टाक हंडी.
देवा तु सर्वेश विघ्नहर्ता
तुझ्यावर आमचा भरोसा,
कर आता तुच संरक्षण,
आवळ आता कडक फासा.
कवयित्री सौ. सुनंदा वाळुंज ठाणे

