शतशः नमन
बाप्पा आपणास पत्र लिहण्यास कारण की आपण तीन वर्षांपूर्वी कोरोनाच्या घाई गडबडीत आला होता आपल्याला आठवते दहा दिवस राहुन गेले पण तुम्ही आम्हाला बप्पा आल्या सारखे वाटले नाही त्या वर्षी सर्वांची कोरोनामुळे धावपळ उडाली होती तुमच्या कडे आम्हाला लक्षच देता आले नाही त्या वर्षी आपण आलो होतो तुमचे आगमन झाले पण बाप्पा आपणास वाजत गाजत तुम्हाला आम्ही आनंदानी आणलो नाही तुम्हास गुपचीप आनुन आमच्या घरी बसवलो होतो. साकाळ संध्याकाळ आरती पुजा करायचो पण लांब उभे राहुनच .नैवेद्य लांब उभे राहुन दाखवायचे असे त्या कोरोनाच्या महामारिमुळे व्हायचे त्या वेळी तुम्हाला आमच्या मनातील कांही हितगुज सांगायचे बोलायचे राहुन गेले तुम्ही बप्पा त्या वर्षी आम्हाला नाही आल्यासारखे वाटले त्या वर्षी आमच्या कडुन तुमची मनासारखे सेवा झाली नाही तरी बाप्पा यावर्षी आपण लौकर यावे आणि राहिलेली सेवा व आमचे हितगुज ऐकुन घ्यावे बाप्पा तुम्ही त्या वर्षी प्रुथवी तलावावरिल कोरोनाचे संकट दुर केलेत आणि आम्हा सर्व जिवीतांचे प्राण वाचवलेत म्हणुन बाप्पा आपणास नंम्र विनंती आहे आपण या वर्षी लवकर यावे.
खरा भक्त
लेखक गोविंद संभाजी श्रीमंगल, लातुर.

