गुरू यशाचा गंधीत वारा
सुगंध त्यांचा पसरे मनभर
उंच भरारी या पंखाना
कृपादृष्टी करिता गुरूवर
गुरू जलाशय झुळझुळणारा
गुरू विद्येचे खुले अंबर
झऱ्यात झुळझुळ या विद्येच्या
तहानलेला भरतो घागर
गुरु असतो कलेस कोंदण
शब्दांनाही शाही गोंदण
सुरेल मंगल गुरू सुरावट
द्ददयच द्यावे त्यांना आंदण
गुरू दाखवी मार्ग यशाचा
उजेड देई भव ज्ञानाचा
आशिर्वच तो दत्त गुरुंचा
पुत्र लाडका सरस्वतीचा
आज आहे गुरुपौर्णिमा
नमन माझे गुरुजनांचा
सांगू किती अजून महती
नतमस्तक मी तव चरणांना
कवयित्री गुलाब अनिल वेर्णेकर, गोवा

