बाप्पाला घरी घेऊन जात असताना दुचाकीने भररस्त्यात घेतला पेट

0
189

सोलापूर प्रतिनिधी – गणरायाचे राज्यात मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. अनेकांची बाप्पाची मुहूर्तावर मूर्तीस्थापन करण्यासाठी एकच लगबग सुरु झाली आहे. सोलापूरात मात्र गणरायांच्या उत्सवाच्या दिवशी एक अपघात घडला. लाडक्या बाप्पाला घेऊन जात असताना धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीने अचानक पेट घेतला आहे. दुचाकी चालकाच्या वेळेत लक्षात आल्यावर, दुचाकी थांबवून बाजूला थांबवण्यात आली. बघता बघता इलेक्ट्रिक वाहनाने अचानक जास्त पेट घेतला. जाग्यावर जळून दुचाकी खाक झाली. चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. सदर घटनेनंतर दुचाकी चालकाने पोलीस प्रशासना आणि अग्निशामक दलाचे आभार व्यक्त केले.

आजची कथा – वेड्या मना


बाप्पाची मूर्ती घेऊन जाताना मोठा अनर्थ टळला
सोलापूर शहरातील मार्कंडेय जलतरण तलावानजीक शनिवारी सकाळी अक्षय जगन्नाथ(राहणार, सोलापूर) भावासह आणि छोट्या मुलांसह बाप्पाची मूर्ती घेऊन घराकडे निघाले होते. दुचाकी वाहन चालवत असताना, धावत्या इलेक्ट्रिक वाहनातून धूर निघू लागला. इतर वाहनधारकांनी लक्षात आणून दिल्यावर अक्षय जगन्नाथ यांनी बाप्पाची मूर्ती घेऊन,भाऊ आणि मुलाला घेऊन दुचाकी रस्ताच्या एका बाजूला थांबवली. दुचाकीवर बसलेले सर्व रस्ताच्या एका बाजूला उभे राहिले. बघता बघता इलेक्ट्रिक दुचाकीने पेट घेतला. दुचाकीला भीषण आग लागली, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांची अंतर ठेवून वर्दळ सुरु होती. काही वेळातच दुचाकी वाहन जळून खाक झाले.

आजची कविता – गुरू


वाहनात ठेवलेली रक्कम जळून खाक
घटनेची माहिती मिळताच स्थळी अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणताच गाडी क्रमांक MH १३ DZ ८९३३ सदर गाडीची अक्षय जगन्नाथ यांनी पोलीसांना माहिती दिली. लहान मुलाला कपडे आणण्यासाठी दुचाकी वाहनाच्या डिकीत बारा हजार रुपयांची रोकड जमा करण्यात आली होती. अचानक आग लागल्याने गाडीत कपडे आणि गौरीसाठी ठेवलेले १२ हजार रुपये गाडीच्या डीकीत जळून नष्ट झाले. सदर घटेनत कुठलीही जीवित हानी झाली नसून मात्र इलेक्ट्रिक बाइकला आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आणि इलेक्ट्रिक बाईक जाळल्याची माहिती संबंधित शोरुमला देण्यात आल्याची माहिती दुचाकी चालकांनी दिली आहे.

आजची कविता- नव्या पिढीचा शिल्पकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here