आजचा लेख – स्पर्श आठवांचा
स्पर्श किती सुंदर असतो.आईचा बाळाला गोंजारत असतानाचा,बाबांचा आपल्याला धीर देत असताना पाठीवरून फिरणारा उबदार हाथ हत्तीचे बळ देऊन जाते.मैत्रीचा स्पर्श जगण्याचे अमृत असते.जोडीदाराचा मधुर स्पर्श जीवनात प्रितमय बाग फुलवते.
संकटाच्या वेळी धीर देणारा हात जगण्याची आशा पल्लवित करते.यश आल्यानंतर अभीमानाने आई, बाबांच्या डोळ्यातील आनंदाचे अश्रू बरेच काही शिकवून जाते.
पराजयात सुद्धा हृदयाशी कवटाळून पुन्हा प्रयत्न करायला सांगणारा बाप मनात आशावादाचे बीज पेरते.
स्पर्श आठवांचा हृदयात साठवलेला असतो.तो आपल्याला खचू देत नाही.मी सदोदीत तुझ्या सोबत आहे याची जाणीव करून देतो.
मुक्या भावनांना स्पर्श कळतो.न बोलताही स्पर्श बरेच काही सांगून जातो.लेक सासरला जाताना आईला कवटाळते ,आई तीला धीर देत असते.तीचे मन गहिवरून येते.परंतु ती दाखवत नाही.आजी, आजोबा जेव्हा नातवाची गोड गोड पप्पी घेते त्या स्पर्शात त्यांचे प्रेम ओतप्रोत भरलेले असते.
मुक्या जनावरांना स्पर्शाची जाणीव असते.ते आपल्या मालकाचा स्पर्श ओळखत असतात.
स्पर्श आठवांचा हा मनामध्ये रुंजी घालत असतो.तो पुन्हा पुन्हा आपल्याला जगण्याचे गुपीत सांगत असतो.म्हणुन तो स्पर्श हृदयात कोरुन ठेवा.गोड, अविट आठवांचा.
लेखिका शोभा वेले
नागपूर

