आजची कविता – निरोप देता तुला मन गहिवरले….

0
248

आजची कविता – निरोप देता तुला मन गहिवरले....

हे गणनायका सुखदायका
कृपा ठेव सदा आम्हांवरी
तुझ्या चरणांचे दास आम्ही
रक्षण कर जन्मभरी.

तु आला कि पृथ्वी सारी
तल्लीन होऊन जाते,
सगळ्या चराचरात
आनंदाला उधाण येते.

दहा दिवस कसे जातात
कळत सुद्धा नाही,
तुझ्या येण्याने घराघरात
जल्लोषालाउधाण येई.

तुला मस्त निरोप देतो
ढोलताशांच्या गजराने,
पण मन येतं भरुन खुप
तुझ्या अशा जाण्याने.

मन गहिवरून जाते
निरोप देता तुला,
लवकरच येशील ना बाप्पा
एवढे वचन दे मला.

कवयित्री
सुनंदा वाळुंज
ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here