आजचा लेख – आहे ऐकण्याची मनस्थिती

0
108

आधीच्या काळापासूनच म्हणजे आजी आजोबा पणजोबांच्या काळापासूनच स्त्रीला एक शिकवण अशी दिली आहे की घरच्या पुरुष मंडळीचा मानसन्मान असलाच पाहिजे. मग त्यात काही स्त्रीला आपले मन मारून जगण्याची एक सवयच आधीपासून रूढ झालेली आहे. बरोबरीचा हक्क बुद्ध काळापासूनच नारीला दिले आहे पण अपवादाची बाब ही आहे की तिने एक कमजोर स्त्री म्हणून स्वतःला बनवून घेतले. त्यामुळेच बालविवाह प्रथा, सती प्रथा आधी पाहण्यात येत होत्या. पण काही आपल्या थोर पुढार्‍यांमुळे या प्रथा आळा घालण्यात आल्या. पण अशावेळी पुरुषांच्या मनाला कुठेतरी धक्का बसलेला आढळून येतो असे वाटते. त्यामुळे स्त्री ही कोणत्याही कितीही मोठ्या हुद्द्यावर असली तरी तिला दाबून ठेवण्याचे धाडस हा पुरुष समाज करत असतो. मग त्यात जन्मदाता, भाऊ, किंवा पती या प्रकारे त्यांचा समावेश असतो. स्त्री म्हटलं की तिला स्वतःचा परिवार सांभाळूनच ती आपले कार्य, नोकरी, उद्योग करीत असते. आणि अशावेळी तिला खूप काही अडथळ्यांना तोंड देऊनच पुढे पाऊल टाकायचे असते. ती कितीही स्वतःच्या परिवाराची काळजी घेत असली तरी तिला घरच्या परिवाराच्या समाजाच्या व्यक्तींच्या बोलण्याकडे किंवा त्यांच्या चुगली चहाड्यान कडे लक्ष न देता ऐकण्याची मनस्थिती ठेवूनच पुढे जाण्याची जिद्द ठेवून ती आज पुरुषांच्या बरोबरीला असण्याचे तिने सिद्ध करून दाखविले आहे. तिचे कार्य खूप मोठे मोलाचे असते. हप्त्यातले सात दिवस 24 तास ती कधीही तत्परतेने उभी राहण्यास सिद्ध असते जेव्हा तिच्या परिवारावर काही अडथळ्यांचा डोंगर कोसळला तर ती एक नाविक बनून त्या अडचणींना पार पाडण्यास पूर्णपणे समर्थ असते. माझे म्हणणे असे नाही की प्रत्येक पुरुष हा अडथळे देणाराच असतो पण त्याच्यावर बिंबविलेले ते चित्र त्यांना पुरुषप्रधान समाज आहे हे क्षण प्रती क्षण त्यांच्या अंतर्मनाला सांगत असल्याने यात पुरुषांची काही चुकी नसेल असे वाटते. म्हणून काहीही एवढेच ऐकायचे की ऐकण्याची मनस्थिती सीमित असली पाहिजे. आणि जर काही ऐकण्यापासून अडथळे निर्माण होत असतील तर प्रतिउत्तर देणे हे खूपच गरजेचे असते .कारण स्त्री ही एका मोमाप्रमाणे असू शकते ,तर ती कठोर दगडाप्रमाणे पण व्हायला तिला वेळ लागत नसतो.

लेखिका रंजना भैसारे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here