आजची कविता – पाऊस

0
104

पहिला पाऊस तनामनावर
गारूड होऊन मिही पाऊस
ओली माती वेडा पाऊस
थेंब होऊनी नकोच येऊस

पाऊस ओला अंगण ओले
खिडकीला ही नवीन डोळे
नभात पाऊस मनात पाऊस
विज सोनसळी नकोच येऊस

गौरगुलाबी आठवणींना
साद घालते तप्त मेघविणा
सुटतो वारा सळसळ पाना
गुज रानावनात वाजती पैजणा

कवयित्री गुलाब अनिल वेर्णेकार
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here