मुलींसाठी शिक्षणाचा
सावित्रीबाई दीप लावला
मुलींच्या शिक्षणाकरीत
प्रखर अंधाराचाअंत केला..
शिक्षणाचा अधिकार
मुलींना दिला
स्त्रीसन्मानाचा वसा
सावित्रीबाई पाळला…
सावित्रीबाईच्या त्यागाने
समाज घडला
स्त्रीशिक्षणाचा मूळ
पाया त्यांनी बांधला…
समाजातील जातिभेदाचा
अडथळा तोडला
मुलींना शिक्षणाचा
निस्वार्थी हक्क दिला…
सावित्रीबाई फुलेच्या
धैर्याने इतिहास घडला
समतेचा मार्ग चालत
शिक्षण दीप उजळून आला…
सावित्रीबाई फ़ुलेच्या
कार्याने समाज जळला
नवा प्रकाश उजळून
प्रत्येक घरी पसरला…
कवयित्री जयश्री वागरे/ धुतराज
शिक्षिका, नांदेड

