prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – स्त्री शिक्षणाची प्रणेती

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – स्त्री शिक्षणाची प्रणेती

0
65

थोर माय माऊली तू सावित्रीमाई
धन्य तुझा कार्याचा महिमा दिसे
निघाली उंबरठा ओलांडून घराचा
स्त्री शिक्षणाची बीजे पेरली असे..

मुलींना शिक्षण देण्यासाठी
समाजमन गेले होते शून्यात
स्त्री शिक्षणाने उजळेल ज्योती
पटवून दिले खरे तुम्हीं डोक्यात..

समाज परिवर्तनाच्या चळवळीत
साथ जोतिबांच्या निःस्वार्थ कार्यात
सावलीसारखी उभी राहिली धैर्याने
समाजातील संकटावर केली मात…

शेणगोळ्याचा मारा सहन करून
शाळेत शिकविण्यास रोज जाई
सत्याचा प्रामाणिक विजय होईल
तुझा अफाट विश्वास होता माई…

सावित्रीमाईचे असे कार्य महान
स्वकष्टाने मिळविला देशातील मान
भारतातील प्रथम शिक्षिकेचा मिळविला
इतिहासात सुवर्ण अक्षराने सन्मान..

संगीता नागदिवे…सना
यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here