माझ्या सावित्रीमाईनी
ज्योत ज्ञानाची लावली
स्वतः शिक्षीत होऊन
वाट आम्हाला दावली.
माय तुझे गुणगान
किती गाऊ दीनरात
माझ्या घरात उजेड
पणती ठेवली तेवत.
तु केली मेहनत
आम्ही आहोत भाग्यवान
आयुष्यभर आम्ही
गाऊ तुझेच गुणगान.
बाप महात्मा फुल्यांनी
तुला आधार गं दिला.
आमच्या अंधा-या आयुष्यात
दीप ज्ञानाचा लावीला.
तुझ्या कष्टाचं गं पांग
कसं फेडु मी गं माई
येती डोळ्यात आसवं
तुझे कष्ट आठवता बाई.
किती झटली आमच्यासाठी
आम्ही शिकलो सवरलो
भिडे वाडा जन्मदाता आम्ही
कसा गं विसरलो..
कवयित्री सौ सुनंदा वाळुंज ठाणे.

