इंद्रावती नदीवर आंतरराज्यीय पुलाची निर्मिती
तालुका प्रतिनिधी अहेरी
विवेक मिरालवार
8830554583
अहेरी : जिल्ह्याच्या
दक्षिण भागातील अहेरी तालुक्याची सीमा ही तेलंगणा आणि छत्तीसगड राज्याला लागून आहे. मागील काही वर्षांपूर्वी अहेरीजवळील वांगेपल्ली येथील प्राणहिता नदीवर तेलंगणा सरकारने आंतरराज्यीय पुलाचे बांधकाम केल्याने दोन राज्यातील दळणवळण सुकर झाले आहे. आता याच तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या दामरंचा जवळील इंद्रावती नदीवर पुन्हा एका आंतरराज्यीय पुलाचे बांधकाम होणार असल्याने अहेरी तालुका थेट छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्याला जोडणार आहे. त्यामुळे हा अतिदुर्गम दामरंचा परिसर आता विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९
डिसेंबर रोजी एस. एस. साळुंके सचिव (रस्ते) यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता दिनेश नंदनवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता नीता ठाकरे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्लीचे अधिकारी आणि पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या आंतरराज्यीय पुलाची निविदा नागपूर
काही दिवसांत बांधकामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे. इंद्रावती नदीवरील आंतरराज्यीय पुलाचे बांधकाम ४३ कोटींच्या निधीतून केले जाणार असून, यासाठी केंद्र शासनाने ६० टक्के आणि राज्य शासनाने ४० टक्के निधी दिला आहे. या पुलाची लांबी ही ७५० मीटर असून सध्या डिझाइन बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे. इंद्रावती
नदी पलीकडे छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्याची सीमा आहे. हा परिसर अत्यंत घनदाट जंगलाने व्यापला आहे. शिवाय अहेरी तालुक्यातील दामरंचा हे गाव महाराष्ट्र राज्यातील शेवटच्या टोकावर आहे. या भागातील अनेक गावे आजही विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकले नाही. या भागातील रस्ते, नदी-नाल्यावरील पुलाचे बांधकाम करून शासन कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी प्रयत्नात आहे…

