उंबरठ्यावर फुले वेचतांना
जपून टाक अंतर्मनाचा श्वास
जर टाकलास विश्वास…तर
तो प्रत्येक वेळी आपलाच
राहिलं अशी खात्री नाही…
चालशील जरी त्या वाटेवर
पण… प्रत्येक वाटेवर मखमल
असेलच असे नाही….
त्या वाटेवर चालतांना
जपून कर नाती….कारण
तो वाटसरु आपलाच
राहील असे नाही…
इथे वावरतांना….
प्रत्येक चेहरे भेटतील
पण…ते आपल्याच विश्वात
रममाण होतील असे नाही….
कारण…एका चेहऱ्यावर अनेक
मुखवटे चढवतात लोक…..
कवयित्री- प्रतिभा केदार पवार
बहादरपूर जळगाव

