Home कविता कविता – रमाई

कविता – रमाई

0
224

बहुजणांच्या कल्याणपाई
बनली माता रमाई
देऊन साथ भिमाला
दलितांची बनली आई….

त्यागालाही वाटावी लाज
असा रमाईचा त्याग
तुझ्या त्यागानेचं निर्माण झाली
दलितामध्ये स्वाभिमानाची आग….

अस्पृश्याच्या लेकरांची
बनली रमाई सावली
भिमाच्या पाठी खंबीर
पतीव्रता ती माऊली….

चळवळीत दलितांच्या
नौका सांभाळली भीमजिवणाची
झाले आंबेडकर जगाचे बाबा
रमाई बनली माय जणांची….

आयुष्यभर कष्ट होते वाट्याला
तरी होती भिमाच्या साथीला
दिव्यासमान होते भिमराव
रमाई प्रकाशमय होती वातीला..

कवयित्री-सौ. सीमा गाडेकर
यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here