देवाला जाता येईना घरोघरी,
म्हणुनच ‘आई’ हे स्वत:चेच रूप ठेवले खरोखरी.
काळिज आपले घातले तिच्या र्ह
दयात,
करूणेला त्या म्हणतात ‘मातृर्हुदय’
आईचा हात शिरी असे,
सारे सुख पायाशी लोळते,
भय भिती कसलीच नसे,
आई करूणेचा सागर,
आई जिवनाची शिल्पकार,
आई मायेचा आधार,
आई म्हणजे सर्वस्वच खरोखर,
अंतापर्यंत झिजते,थकत नाही,
परी सदैव लेकरांचे हित चिंतिते.
माणुस म्हणुन घडवते,
गूरू होऊन संस्कार देते,
वळण शिस्त समजावते,
माणुसकीवर तिची असते भिस्त,
आई लेकरांची साऊली
आई मायेची माऊली
देव रहातो राऊळी,
माय मात्र लेकरांजवळी,
माय माझी तशी साधी भोळी,
माय माझी
रूप तिचे आठवता पाणी येई डोळी.
कवियत्री अनुराधा जोशी
अंधेरी मुंबई- ६९

