आईमुळे आला माझ्या
आता जीवनाला अर्थ
कोणत्याही गोष्टीसाठी
नाही तिच्या मनी स्वार्थ….
माया ममतेने तिचा
आहे हृदय भरून
करी सर्वांवर प्रेम
तरी उरून पूरून….
नसे मनी भेदभाव
तिला सारेच समान
तिच्या पुण्याईने आम्हा
समाजात मिळे मान…
आई नेहमी असते
महागुरू लेकरांची
जिम्मेदारी निभावते
त्यांना छान घडण्याची…
आई समान दैवत
नाही जगात दुसरा
तिच्या पदरात मिळे
सर्व मुलांना आसरा….
आई नसता घरात
घर उदास वाटते
आई विना लेकरांचे
दु:ख हृदयी दाटते.
कवियत्री – लोपामुद्रा शहारे
नागपूर मानेवाडा

