आई मायेच घागर
माया त्यात आभाळभर
वाटायला गेली माया
ओसंबते मुलाप्रती चौफेर //१//
आई संगीताचं गाणं
तिचं खूप मोठं लेन
तार छेडीता सुरांचे
ऐकावया वाटे छान //२//
माई माय देइ आराम सुखाचा
नाही तिच्या छायेत मज दुःख
करी पायपिटा स्वतःचा
मुलांना जगण्यास देते सुख //३//
ती दयाळू या जगात
राही माय कोणत्याही देशात
वात्सल्य या मायेचे कुठेही
प्रित देते ती कोणत्याही वेशात //४//
मोठे होऊन बालका नको करू
तिला दूर ,येवो सून या जावई
प्रीत द्यावे तिला अनमोल
तीजविण नाही या जगात कोणी //५//
नको पाठवू तिला तू
सांगण्यावरून कुणाच्या वाटा
वृद्धाश्रमाला नको नेऊ
ती तुझ्या घरचा आहे उंबरठा //६//
स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी
वेळ गेल्यावर नको
तिला देऊ तू न्याहारी //७//
कवियत्री रंजना भैसारे
नागपूर

