लेख – माझा गुरु

0
100

आज दि. 14/7/2024 लेख – माझा गुरु

गुरु म्हटलं तर आपल्यासमोर जिवंत अशी मूर्ती असते ती आई कारण तिच्या उदरातून शिकवणीचे धडे मिळण्याची सुरुवात असते आई सांगेल त्यांना आपल्याला गुरु मानावे लागते म्हणजेच प्रथम गुरू आई तिला प्रत्येकानेच नतमस्तक झालेच पाहिजे ही आपल्याला प्रकृतीची शिकवण आहे दुसरा गुरु हा असतो अनुभव आपण समाजात वावरत असताना बरे वाईट असे अनेक अनुभव घडत असतात खूप काही लोक चांगले अनुभव देत असतात तर काही खूप खडतर असे अनुभव देतात ज्यातून काहीतरी शिकायला मिळते व त्यातून काहीतरी नवीन मार्ग निघत असतात अनुभव देणाऱ्यांपैकी काही आपले नातेवाईक आजूबाजूच्या परिसरातील व्यक्तींचा समावेश असू शकतो पण कधी कुणाबद्दल द्वेषाची इर्षाची भावना कधीच ठेवू नये कारण द्वेषाने आपण
कुठेतरी स्वतःचेच बरे वाईट करीत असतो प्रकृती ही एक अशी महान शक्ती आहे जिथे परतफेड इथेच पूर्ण करावे लागते म्हणजेच जमिनीत पेरलेले बी जसे उगवून वरती येऊन वनस्पती रोपटे बनते त्याच प्रकारे कर्माचे असते जसे आपण कर्म करतो तेच वापस आपल्यापर्यंत पोहोचते
संत महात्मे हे सुद्धा आपले गुरु आहेत त्यांचे विचार तर्कशुद्ध असतात त्यांच्या विचारांमुळे जीवन जगण्याच्या पद्धतीत भर पडतो आपले शालेय शैक्षणिक आदरणीय शिक्षक वृंद यांची कितीही स्तुती करा कमीच असते शालेय शिक्षणात तर टीचर मुलांना हात पकडून शिकवण्यापासून तर शिक्षा देण्याचे कार्य ते करीत असतात कारण त्यांना आपल्या विद्यार्थी उत्कृष्ट नागरिक व्हावी याची पूर्ण ते काळजी घेतात स्वतः आपण आपले गुरू का म्हणजे आपल्याला क्षण प्रतीक्षण नवीन काहीतरी आपण शिकत असतो स्वतःला शिकवीत असतो जीवनातून धडे घेत असतो व देत असतो प्रकृती यापासून आपण बरेच काही शिकत असतो जल थल वायू आकाश अग्नी या सर्व आपल्यासाठी प्रत्येक क्षणी गरजेचे असतात पण त्याचा वापर विपरीत केला तर काही दुष्परिणामच आपल्याला मिळतात प्रकृती जेवढी आनंददायी असते तेवढीच भयावह होऊ शकते म्हणून महात्मा तथागत बुद्धांचे वाक्य आहेत सम्यक ज्ञान सम्यक विचार सम्यक वाचा सर्वकाही आपल्या सोबत समतोल असेल तर जीवन सुखमय होते.

लेखिका – रंजना भैसारे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here