Home कविता आजची कविता – स्त्री शक्ती तु 

आजची कविता – स्त्री शक्ती तु 

0
258

आजची कविता – स्त्री शक्ती तु 

रणरागिनी तु शक्तीची
भीती न तुला कसली
खोस पदर कमरेला
दाखव तुझं आस्तित्व असली..

असतील कष्ट, असतील यातना
तरी तु ताठ उभी रहा
सळसळत्या रक्तामधली
ज्वाला तु, अहिल्या बनून रहा..

नको हरवूस स्वतःला
सौंदर्याच्या गर्दीत तु
बन झाशीची शक्ती
मीराबाईची भक्ती तु..

कर्तव्याची मशाल पेटव
तलवार घेऊन हाती
अन्यायाविरुद्ध वाघीण बन
फोड डरकाळी न्यायासाठी…

नराधमाच्या पापाची
तीव्र काली,छटा तु
नरडीचा घेऊनि घोट
यमसदणी पाठवणारी सत्यकथा तु..

भावनाशून्य झालीय माणुसकी
निष्पाप कळ्यांचा होतोय अंत
उठ लढ, बन मर्दानी
रच तुझ्या आयुष्याचा नवा ग्रंथ…

स्त्री शक्तीचा महिमा न्यारा
उरात तुझ्या वात्सल्य छाया
कठीण नाही लढाई कुठली
तुझ्या कुशीत, आभाळमाया..

कवियत्री – सौ. सीमा गाडेकर
यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here