आजची कविता – नराधम
काय चाललंय संस्कृतीच्या ह्या देशात
नाही सुरक्षित कळ्या आपल्याच मळ्यात….
माळीच करताहेत कत्तल कळ्यांची,
सा-या सापडल्या काट्यांच्या कचाट्यात….
स्त्री भृण हत्या गर्भातच होई…
जन्माला मुलींच्या जणू अर्थ ना काही..
आपलेच रचतात डाव खुनाचा ,
वैरी दडलाय आपल्यातच बाई…
कोवळी नजर, मुलींची भिरभिरे
हाताला धरून, खुनीच नेतो पुढे…
कधी खाऊचे आमिष, कधी बळजबरीने ओढे, कुस्करून कळीला मग, गळाही आवळे…
संस्कृतीच्या बाता येथे मोठमोठ्या
देवीला ओढती ओढणी ,मुली करती नागड्या….
अमानुषतेच्या ओलांडती सा-या सीमा ,
मुक्या करिती बघा ,कळ्या बोबड्या बोबड्या…
बघताच मुली, नराधम होती हे लांडगे
तोडतात कोवळ्या, मुलींचे लचके.
विसरतात जन्म घेतलाय स्त्री पोटी,
तरी ,स्त्री बघताच ह्यांची,लाळच बघा टपके….
फाशीच द्यावी अशा नराधमांना
भर चौकात करावे ह्यांना उघडे….
नेते असोत वा सामान्य माणूस ,
शिक्षेत सारेच होवोत येथे नागडे..
कवियत्री आशा फुल्लुके
बोरीवली मुंबई ..

