सावर तू या वेड्या मना
गंध तुझा कसा मनी दरवळे
हाव कशाला तुजला
धनसंपत्तीच्या त्या मोहाची
प्रेम असू दे मनी सदा
कर आई बापाची सेवा
पुजितो तू देव्हाऱ्यातील देव सारे
माया तशीच प्रेम सारे दे माय बापा
नको धरू गर्व संपत्तीचा
नाश तुझा तिथेच झाला
माय तुझी बाप तुझा
मित्र तुझे सखे सोबती तुझे
तूच आधार देसी त्यांना
तूच लावी जीव रे
सोबत घेऊन चल सारे
ना भीती कुणाची येई रे
दगम गेल आधार तुझा
हिम्मत देतील सारे रे
सावर रे तू वेड्या मना
नको धरूस मोह माया
सावर रे तू वेड्या मना
कवयित्री तृप्ती वाव्हळ
ता. शिरूर. जि. पुणे

