पदरी माझ्या दोन लेकी,
दिसतात नक्षत्रावानी,
पण किती काढले दिवस
एखाद्या गरीबावानी.
होती माझी दळभर,
नव्हता घरात किराणा,
पण लेकी माझ्या समंजस
स्वाभिमान हा त्यांचा बाणा.
कधीच हट्ट कशासाठी
नाही केला त्यांनी,
बाबांचा तुटपुंजा पगार
राहील्या अर्धवट पोटांनी.
लोकांची नवी कपडे पाहून
हिरमुसल्या व्हायच्या,
आतल्या आत दुःखी होऊन,
खेळात रमुन जायच्या.
लेकी माझ्या गुणी फार
वाटतो मला अभिमान,
आज त्यांच्या पायावर
उभ्या,मिळतो सगळीकडे मान.
त्यांचे बाबांना बीएमसीत
नोकरी मोठ्या पगाराची,
एक मुलगी सॉफ्टवेअर इंजिनिअर,
तर दुसरीचे अकाऊंटमध्ये करीयर.
खरंच त्यांच्या जन्मावेळी
वंशाच्या दिव्यासाठी होते मी दुःखी,
जगात वंशाच्या दिव्यांचा उजेड बघुन वाटते मी आहे खुप सुखी.
कवियत्री – सौ सुनंदा वाळुंज ठाणे

