गाढ निद्राधीन असताना
स्वप्न पडले झोपेत
दिसली चंद्रावरची शाळा
शाळेत मी होते मजेत
आकाशात होत्या रात्री
चांदण्या खूप साऱ्या
त्यातच गेला वर्ग भरून
छान होता नजारा
आकाशात होता
चांद का तुकडा
ढगांच्या लपाछपीत
दाखवत होता मुखडा
गुरु, शुक्र, शनि, रवी
तेजोवलंयांकित होते सारे
चांदण्यांच्या लपाछपीत
लखलखत होते प्यारे
कवयित्री रेखा डायस
गोवा

