जिवनात प्रत्येक क्षण महत्वाचा असतो.आणि प्रत्येक क्षण सुंदर असावा असं प्रत्येकाला वाटत असतं.पण कधी कधी आपल्या बरोबर सगेसोयरे मित्रपरीवार हितचिंतक असुनही एकाकी वाटतं असा क्षण प्रत्येकाच्या जिवनात येतो.हा क्षण म्हणजे निरोपाचा क्षण .दिवस भरभर सरले पुन्हा एकदा जुन्या वर्षाला निरोप देण्याची वेळ आली आणि आपण सर्वांनी सरत्या वर्षाला निरोप अन् नविन वर्षाचे स्वागत असे दोन्ही सोहळे साजरे केले
आता नवीन वर्ष उगवून बरेच क्षण निघून गेले आहेत.तरीही मनाच्या गाभार्यात काही आठवणींचा सुगंध अजुनही दरवळतोय.कडु – गोड स्मृतीचा सुरेख संगम म्हणजे आठवणी.काही कमवल्याच सुख तर काही गमवल्याचं दु:ख कळत नकळत होवून गेलेल्या चुका मैत्रीतला तो जिव्हाळा या सार्या आठवणी मनाला हुरहूर लावून जातात .या आठवणी मनाभोवती फेर थरतात तर काही ह्यदयाच्या मऊ – मखमली पंखावर आठवणींचा पिसारा फुलतो.या आठवणी एखाद्या चित्रफिती प्रमाणे डोळ्यासमोरून सरकतात अन् डोळ्यात पाणी दाटतं असा हा निरोपाचा क्षण मनाला हुरहूर लावून जातो
जुनं वर्षे मावळून नवीन वर्ष उगवणे हे सुष्टीचे निसर्गाचे कधीही न संपणारे चक्र आहे. जुनं वर्षे संपून नव्या वर्षाची सुरूवात होते म्हणून आपण आनंदोत्सव साजरा करतो. हा उत्सव ज्या पद्धतीने साजरा केला जातो ते बरोबर आहे का ? मादक द्रव्य घेवून धागडधिंगा करून ओल्या पार्ट्या करून नवे वर्षे सुखाने जाणार आहे का ? नवीन वर्षाच्या सुरूवातीला प्रोढ शिक्षण अंधश्रद्धा निर्मूलन स्वच्छता आभियान पर्यावरण शिक्षण एडस जनजागृती हुंडा विरोधी कार्यक्रम यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करून ते पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करावा.तेव्हाच नवीन वर्ष साजरे केल्याचे सुख मिळेल.
मागील वर्षाच्या उदरातुन नवीन वर्षाचा उदय होतो.नव्या वर्षाचे स्वागत करतांना मागील वर्षाच्या आठवणींना उजाळा देणे गरजेचे आहे .कारण आपल्या आयुष्यात एका वर्षाची भर पडली आहे. अनुभव हा सर्वोत्तम मार्गदर्शक असतो.प्रत्येक क्षेत्रात नियोजन आखलेले असते.नियोजन आखून केलेले कार्य यशाच्या दिशेने वाटचाल करत असते.या नवं वर्षात आपण सर्वजण नियोजनाचे महत्त्व ओळखून आपल्या कार्यक्षमतेची वाट यशस्वी करून यशोशिखर गाठण्याचा निर्धार करूया
या नवं वर्षात सुखाच्या लखलखत्या किरणांनी दु:खाचा आंधार विरून जावा.प्रत्येक स्त्रीला सन्मानाने जगता यावं.एकही स्त्री भ्रुण हत्या होवू नये. वृद्धांना मायेचा ओलावा मिळावा. सुखाचा गारवा मिळवा.अनाथ निष्पाप बालकांच्या ओठांवर सदैव हास्य फुलावं.
बुद्ध फुले शाहु आंबेडकर गाडगेबाबा यांचे विचार मनामनात रूजावे अन् जात धर्माची रीत मोडावी
वैशाली वागरे – भुक्तरे
पालीनगर नांदेड

