नवा प्रकाश नव्या आशा
स्वप्नांची असे नवीन आस
हर्षोल्हासाच्या प्रवाहात
मनी उजळला आनंद खास…
नवा उत्साह नवा सोहळा
जीवना मिळो नवा आकार
प्रत्येक क्षण खास ठरवून
स्वप्न सारी व्हावीत साकार…
नव्या संधीचे दार उघडू
आशेचा किरण उजळू
प्रेमाचा प्रकाश पसरून
आपुलकीचे नाते सांभाळून…
जीवनाच्या रंगमंचावर
गेल्या वर्षाचे दुःख विसरू
सुखद आयुष्याचे गीत गात
हर्षाने नवा संसार उभारू…
नवीन वर्षाची नवी सुरुवात
आशेने भरलेल्या क्षणाचे
हसरा चेहरा आनंदाचे जीवन
स्वागत करू या नवीन वर्षाचे…
संध्या रायठक / धुतडे
शिक्षिका, नांदेड

