थोर उपकार जिजाऊचे
मातृत्त्वाला देऊन मान
स्वराज्याचे स्वप्न रोवून
घडविले शिवबाला महान…
स्वराज्याचे बीज पेरून
ध्येय दिले नव्या युगाला
संस्कारांचे दीप उजळून
धाडसी बनविले पुत्राला…
कणखरपणाचे देऊन वळण
न्याय शौर्याचा मंत्र दिला
शिवबाच्या प्रत्येक कृतीत
जिजाऊचा थोर वसा दिसला…
आई जिजाऊच्या प्रेरणेने
शिवबा बनले कणखर
कर्तव्यनिष्ठ तत्वांशी होऊन
एकरूप शत्रूंना दिली टक्कर…
जिजाऊच्या अंगणात
संस्काराचा दीप पेटला
आईने घडवले स्वराज्य
त्यागाचा इतिहास जपला…
थोर उपकार जिजाऊचे
स्वराज्याच्या वाटेवरी
त्याग कर्तृत्व धैर्य आदर
अमर राहील शतशः परी…
कवयित्री संध्या रायठक/ धुतडे
शिक्षिका, नांदेड

