प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – आठवण

0
66

आठवण येता सांध्याची
जयश्रीच मन उचंबळते
क्षणोक्षणी जवळ असूनही
आठवणींच जाळं विनते..

चांदण पसरता नभी
आठवण मनास सुखावते
सावलीसह चालता दिवस
स्वप्नांत पुन्हा भेटून जाते…

फुलांच्या सुगंधातही
तुला सदा शोधत असते
तुझ हास्य मनावर माझ्या
आनंद पेरून जाते…

आठवण तुझी येता
आसवांचा पूर दाटे
मनाला आशेचा एक
नवनवीन सूर भेटे…

सांध्याच्या आठवणींचा
गंध उरतो श्वासात
प्रेमाने जपते तिला
हृदयाच्या गाभाऱ्यात…

कवयित्री जयश्री वागरे/ धुतराज
शिक्षिका, नांदेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here