आले बागेत फुलपाखरू
रंग त्यांचे किती सुंदर
या फुलांवर त्या फुलावर
उडणे पण किती मनोहर
नृत्य पाहून फुलपाखराचे
काय शोभा बागेस आली
फिरत राहिले अवतीभवती
फुलांनाही मग धुंदी चढली
एक असे फुलपाखरू
यावे रोज मनाच्या बागेत
हा विचार, तो विचार झटकून
फुलपाखरू वसावे मनात
रंग त्यांचे पसरावे देहभर
मीही व्हावे एक रंग
हाती कुंचला मनात रेघा
चित्राचे ना ना ढंग
चल उतरू कागदावर
एक फुलपाखरू संग
कॅनव्हास हा जीवनाचा
अवघा जन्म किती रुपरंग
कवयित्री गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा

