प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – माझी कविता
काय सांगू कविता माझी
कशी शब्दातून बोलते
अस्वस्थ मनातल्या भावना
हळुवार शब्दात मांडते
जे दिसते आजूबाजूला
सुख दुःख मनास भिडते
जसा येईल आकार
तसे कागदावर उतरते
कविता...
आजची कविता – गीता जयंती
मोक्षदा एकादशीस
अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती
सांगितली गीता श्रीकृष्णाने
म्हणून म्हणतात गीता जयंती
गीतेचा हा ग्रंथ
एकमेव आहे
ज्याची जयंती
साजरी केली जाते
केला उपदेश
कृष्णाने, अर्जुनास
कर्म,धर्म ,विषयी
कसे लढावे गुरुंशी
तीच होती भगवद्गीता
भगवंतांनी गायलेली
अठरा अध्याय असलेली
नंतर...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – सन्मान नात्यांचा
आपुलकी हृदयाची,
आणि मनातली भावना,
पुस्तकाच्या नात्यातली,
असते खरी प्रस्तावना...१
काही प्रेमळ शब्दांनी,
हळवेसे व्यक्त व्हावे.
घ्यावी हलकी खबर,
स्नेह सदा दर्शवावे...२
कोणत्याही कारणाने,
जुळलेले नाते सुंदर.
जीवनभर टिकवावे,
ऋणानुबंध निरंतर...३
मानवता हाच खरा धर्म,
राखा आपुलकीचा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नशीब
नशिबापुढे कोणाचेच
काही चालत नाही
नशीब बलवत्तर असेल
तर आयुष्य सुखी राही
नशिबाने साथ दिली
तर नोकरी चांगली मिळते
आणि लग्नासाठी छोकरी ही
नाहीतर...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – आई माझा पहिला गुरु
आई म्हणजे माहेर असतं
कितीही रागावली ओरडली तरी
मायेच्या ओलाव्याचे घर असतं
रात्र असो, दिवस असो
पिल्लांसाठी दार उघडच असतं
काय हवं नको आईकडे मागता येत
दुखलं खुपलं आईला सांगता...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – पाखरांची शाळा
सायंकाळी नदीकिनारी
भरते शाळा पाखरांची
दाट दाट होता सावल्या
येते ऐकू फडफड पंखांची ...
नदीकाठी कितीक पक्षी
थवेच थवे जमती सारे
पाण्यात प्रतिबिंबांचे
जणू चित्र रेखाटती नवे ....
हळूहळू येती पुढे जाती...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नागपंचमी
श्रावणात सणवार
नागपंचमी त्यावर खास
नागोबाची पूजा
घरोघरी उपवास
चंदनाचे नाग
पाटावर काढुनी
दूर्वा आघाडा फुलांनी
पूजा करू वस्त्रहार वाहूनी
वारुळात जाऊन
नागाचे करू आव्हान
लाह्या दुधाचे नैवेद्य
दाखवू करू ध्यान
शेतकरी हर्षित
पालेभाजी कापणे वर्जित
आणू...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – फुलपाखरू
आले बागेत फुलपाखरू
रंग त्यांचे किती सुंदर
या फुलांवर त्या फुलावर
उडणे पण किती मनोहर
नृत्य पाहून फुलपाखराचे
काय शोभा बागेस आली
फिरत राहिले अवतीभवती
फुलांनाही मग धुंदी चढली
एक असे फुलपाखरू
यावे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता गौरव मराठीचा
जन जन बोला प्रिय आम्हाला माय मराठी
युगापासुनी बोलत आलो माय मराठी
मनाआतले शब्दावाचुन कसे कळावे
व्यक्त व्हायची एकच भाषा माय मराठी
शब्द बीज ते काव्यामधुनी पेरत...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – फुलपाखरू
पंख चिमुकले ! निळेजांभळे
हलवूनी झुलते! फुलपाखरू
मी धरू जाता! येई न हाता
दुरच ते उडते ! फुलपाखरू
प्राचार्य गणेश पाटील यांच्या "छान किती दिसते फुलपाखरू!
या कवितेतील या...








