कविता – लोकशाही
लोकशाही भारताची
आहे आन,बान, शान
राखावेच समस्तांनी
जबाबदारीचे भान .... १..
कर्तव्याचे राहो सदा
जनसामान्यास भान
जबाबदारीने वागा
सांगे घटनेचे पान .......२....
लोकशाही विकासाचा
आहे बिलोरी आरसा
जपलाय खरा तिने
शाहू फुलेंचा वारसा...
कविता – दाटती भावना
दाटुनी मेघ अबंरी
पाउस गर्जुनी आला...
मुक्या कळ्यांना तो
कोमजुन पार गेला...
दाविली आस ती
सारीच त्याने मनाला....
चातकापरी तो क्षणात
अंगार टिपुनी गेला...
क्षणभर एकांत मनाला
उलगडला प्रवास सारा....
इथेच न कोणी अतंरीचे
वेचुन...
कविता – मायबाप
माय माझी भोळी साधीशी,
सदा संसारात बुडलेली
चिंता तिला लेकरांची,
सायसाखरी स्पर्शाची.
बाप ऊंच डोंगरापरी,
संकटे झेलतो वरच्यावरी,
स्वताचे मस्तक ऊन्हात,
सावली धरतो घरावरी.
थोर माझे मायबाप
देव्हार्यात बसवावे,
त्यांच्यापुढे मी मस्तक नमवावे.
देव राऊळी...
कविता – आंबेडकरी माणूस
उकिरड्यावरचे जिणे जगून
चंदेरी दुनियेत आले
बाबासाहेबांचे ऋण एव्हाना
पायदळी तुडविले
उंची वस्त्रे,उंची मनोरे
रेटत बसतो स्वप्न कंगोरे
सोने चांदी मोती आले
त्याच्या उषेखाली
विसर पडतो जयंतीचा
कधी येऊन गेली
गाडी, बंगला, उंच महाल
त्याच्या...
कविता- बाप
बाप आभाळा सारखा
त्याला धरतीची माया
नारळाच्या परी बाप
ऊभ्या आयुष्याचा पाया
बाप कष्टाचा पहाड
तसा सोसाट्याचा वारा
नेई एकटा वाहूनी
डोई संकटाचा भारा
बाप विशाल मनाचा
जणू सागराच्या लाटा
आयुष्याच्या अंधारात
चाले तुडवत वाटा
पुणवेच्या...
कविता; लोकशाही
लोकशाही म्हणजेच
लोकांनीच लोकांसाठी
चालवलेले राज्य हे
जनतेच्या हितासाठी.....
गलिच्छ राजकारण
धोक्यामध्ये लोकशाही
भ्रष्टाचारी नेत्यामुळे
आली ही हुकूमशाही....
हल्ली लालची नेत्याने
सारे विकले इमान
सरकारी मालमत्ता
ठेवा...
कविता; मेघ दाटूनी आले
मेघ दाटूनी आले
पाऊस पडण्यास मजबूर
उंचावली गगनात मान
बाप चातकासामन आतूर....
एक थेंब पडता भूवरी
आनंद दुमडू लागला
मुखी आनंद पाहूनी मायेने
संध्या गोडधोड हो केला....
पेरणी करीन शेतात
बैलां आनंदाने सांगते...
कविता; रमाई – भीमाची सावली
रमा होती गुणवंत
मोठ्या दयाळू मनाची
शीलवान पावित्र्याची
प्रतिष्ठेच्या धनाची..
भावी जीवनात पतीची
सेवा करणारी गृहिणी
संसाराची धुरा सांभाळून
कर्तव्यनिष्ठ ती कामिनी....
रमाई बा भीमाची पत्नी
केले तिने...
कविता; सम्यक दृष्टी
बोध सम्यक दृष्टीचा
येथे प्रत्येकास व्हावा
अंधःकार अज्ञानाचा
मन, बुद्धीतून जावा!
आहे जग हे चालले
प्रकृतीच्या नियमाने
नाही होणार बदल
त्यात खोट्या कृत्रिमाने!
आत्मा आणिक मोक्षाच्या
थापा कपोलकल्पित
कर्मकांडाने कधीच
नाही साधणार हित!
चमत्कार, अंधश्रद्धा
यांचा कोण...
कविता; मन
लेखिका, कवी
निर्मल टेंभुर्णे
चंद्रपूर
मन सुन्न असलं ना, वाटतं कुणीतरी यावं...
अलगद अशा मनमोहक स्पर्शाने मन वेधून घ्यावं...
हळुच त्या पावलांचा निशब्द स्वर माझ्या कानी पडावं...
मी शोधत...





