बाप म्हणजे बाप रे
तुमचा आमचा सेम च रे
बाप म्हणजे भक्कम पाया असणारी एकमेव व्यक्ती आहे
बापच असणं म्हणजेच
आपल्या डोक्यावर असणारे छ्त्र
जे दिसत नाही पण प्रत्येक वेळी
छत बनून काळजी घेत असत.
आईच्या माघारी शर्ट पॅन्ट घातलेली आई बनतो आणि
स्वतः मात्र आई सोबतच जळून गेलेला असतो.
बापच दुःख कुणी नाही समजु शकत.
आई ची काळजी सर्वांनाच दिसते
पण बाप रात्रभर काळजीत जागणारा बाप कुणाला कळला नाही.
बाप नावाचं एक गाव असत
सर्वत्र आनंद पसरवत असत
बापाच्या प्रेमाला प्रेम मिळवून देण्याचा प्रयत्न कितीजण करतात बर?
बाप फक्त देवाजवळ
एकच इच्छा व्यक्त करत असतो
मुले सुखात राहील असं काही मागत असतो.
बाप विषयी खूप काही असतं
गड्यांनो आपण बापाला समजून घेतलं पाहिजे !
असे वाटते की नाही?
बाप नावाच्या खोडाला समजून घ्या
त्याची भावना, त्याची दुःख जवळून पाहा.
शक्य असेल तर बघा !
बाप नावाच्या देहाला सुखाची सावली द्या.
त्याची दुःख सारे सुखात सामिल करा
कारण बाप बाप असतो तुमचा आमचा सेम असतो
आणि म्हणूनच तो शांत बसलेला दिसतो.
कधी कधी वाचून बघा बापाच सुखलेल निस्तेज मुख
मन भावना मरून गेलेली असते
तग धरून उभा असतो आयुष्य संपण्याची वाट पाहत असतो
आयुष्याच्या संध्याकाळी
एकटे पण असताना
धायमोकळून रडत असतो
चेहरा मात्र हसरा नाचरा ठेवत असतो
कारण तो फक्त एक बापच असतो तुमचा आमचा सेम असतो.
कवयित्री-सौ. उमा परदेशी
नाशिक

