आईबापाविना आयुष्य
त्याला शब्द न वेगळे
कोडकौतुक तसे ना
उभ्या जगतात मिळे!
चढउतार ते काय
जरी धरले गृहीत
मायबापाच्या दर्शने
सरे शीणही घडीत!
त्यांचे अनुभवी बोल
दीपस्तंभ जगण्याला
तोच आधार केवढा
डळमळत्या मनाला!
मायबाप नसताना
वाटे कर्तृत्व भकास
सुखे स्वर्गीय भोवती
मनी काळोख उदास!
कवी-महादेव भोकरे
वडूज (सातारा)

