भारतीय संविधान एक थोर गाथा आहे.आणि भारतीय संविधान हे घरा – घरात पोहचले पाहिजे. तरच लोकांना खरं संविधान काय आहे हे माहीत होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक महान साहित्य कृती निर्माण केली आहे त्यावर आपल्या संपूर्ण देशाचा कारभार चालतो. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठी आणि लिखित राज्यघटना आहे.
यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्माचा अभ्यास करून लोकांच्या हितासाठी राज्यघटना तयार करण्यात आली आहे.
भारतीय राज्यघटनेत नागरिकांना चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावे यासाठी तयार करण्यात आलीआहे.
भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९५० रोजी अंमलात आली.ही राज्यघटना तयार करण्यासाठी११ सदस्यांची कमिटी होती तसेच ही राज्यघटना तयार करण्यासाठी जवळजवळ ०२ वर्षे ११ महिने १८ दिवस लागले.ही भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन तयार केली आहे.
भारतीय राज्यघटनेत स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या तत्वांचा वापर केला आहे.भारतीय राज्यघटनेत सर्वांना समान अधिकार देण्यात आले आहेत .तसेच नागरिकांचे हक्क आणि त्यांची कर्तव्ये कोणती याचीही माहिती देण्यात आली आहे तसेच स्त्रियांना समान अधिकार भारतीय राजघटनेने दिलेले आहे
आणि याच कायद्यामुळे सर्वजण
भारतील लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत.अशा या भारतीय राज्यघटनेला मानाचा मुजरा
लेखिका – प्रा. कु. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

