नागपंचमीचा सण
चला माहेराला जाऊ
माझं माहेर सुखाच
चला डोळेभरून पाहू।।१।।
सखींही येतील माहेरी
खेळू बालपणीचा खेळ
झिम्मा फुगडी धरून
घालू आनंदाने मेळ।।२।।
झाडाला झोके बांधू
घेऊ उंच उंच झोका
नकळत काळजाचा
बाई चुके माझा ठोका।।३।।
फुलई धरावी गोल गोल
गाऊ माहेराची गाणी
फेर धरून नाचती सखी
पहा कशा आला गवळणी।।४।।
सजून धजून करी सखी
चला वारूळाला जाऊ
नागराजांचे रूप आज
डोळाभरून पाहत राहू।।५।।
श्रावणातील पहिला सण
नागपंचमीचा आला भारी
सुवासिनीच्या रूपाने जणू
लक्ष्मी नांदेल माझ्या घरी।।६।।
पूजा करू नागोबाची
वाहू दूध दही त्याला
आज नागपंचमीच्या दिनी
सौख्य लाभेल आम्हाला।।७।।
कवियत्री प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे,
लातूर

