माझे शिक्षक आदर्श
शिक्षण देतात छान
शिक्षकांमुळे शाळेचा
खरच वाढतो मान।।१।।
शिक्षक देतात ज्ञान
जीवन होते महान
ज्ञानाची कधी आमची
भागत नाही तहान।।२।।
गुरू जगात श्रेष्ठ
वंदन त्यांना करावे
गुरूच्या चला चरणी
सुंदर फुले अर्पावे।।३।।
गुरु शिवाय जीवनी
शोभाच कुठेही नाही
गुरूचा हा आशीर्वाद
सदैव पाठीशी राही।।४।।
गुरू ज्ञानाचा सागर
पेरत जातात मोती
गुरूमुळे आम्हावर
छान संस्कार होती।।५।।
अशा या गुरूंना करू
त्रिवार असे वंदन
त्यांच्यामुळेच फुलते
सुंदर असे जीवन।।६।।
माझे हे शिक्षक मला
जन्मोजन्मी हे मिळावे
त्यांच्यामुळे पुन्हा पुन्हा
जीवन माझे कळावे।।७।।
कवयित्री प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

