आजची कविता – दिवाळी सुखाची

0
137

वैभव संपन्न
दिवाळी सुखाची
पूजा ही लक्ष्मीची
सुख आनंदाची।।

दारात रांगोळी
शोभते सुंदर
दिव्याचा प्रकाश
दिसे मनोहर।।

फुलांच्या माळाही
तोरणं शोभते
सुख व समृद्धी
घरात नांदते।।

नातलग येती
गोकुळ घरात
रायगड किल्ला
बांधला दारात।।

चकली करंजी
लाडू वळू छान
दिवाळीत असे
लाडूलाच मान।।

धनत्रयोदशी
येते लक्ष्मी घरी
सुख व मांगल्य
येई माझ्या दारी।।

पहाटे पासून
लगबग झाली
हर्षाची ही आज
दिवाळी सजली।।

कवयित्री – प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here