आजची कविता – दिवाळीचा सण

0
76

आला गं आला
दिवाळीचा सण
जल्लोष आणि आनंद
करूया उधळण

दिवाळीची मजाच न्यारी
गोडा तीखटाचा फराळ भारी
घराला रंगरंगोटी करूया
सडा रांगोळी ही करूया

सुरुवात होते वसुबारसने
धनत्रयोदशीला करतात
धनाची, लक्ष्मीची पूजा
दिवाळी फराळाला सुरुवात करतात

नरकचतुर्दशीला पूजा महाकालीची
लवकर उठून पहाटे
जाळावे नरकासुराला
अभ्यंगस्नान ही करावे पहाटे

लक्ष्मीपूजनाला वसते लक्ष्मी
करावी पूजा वहीची अन् लक्ष्मीची
दिवाळीचा पाडवा शुभ मुहूर्ताचा
मान असतो पत्नीचा ओवाळण्याचा

भाऊबीजेला असतो
भाबा बहिणीला मान
दीर्घायुष्य मागते भावाला
लाडक्या भावाची बहीण

मजाच मजा दिवाळीत भारी
करूया चला दिवाळी साजरी

कवयित्री- रेखा डायस
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here