पाऊस पडून गेल्यावर
दिसती काजवे झाडात
स्वयं:प्रकाशी चमचम चमचम
फिरती काजवे दिमाखात
अल्प आयुष्य काजव्यांचे
घेतात रूप जणू दिव्यांचे
शांत तेवत असतो दिवा
चमचम फार करतो काजवा
असे काजवे समाजातही
वावरतात मोठ्या दिमाखाने
अंगात कसब नसले तरी
मिरवतात खुप हौसेने
काही काजवे हुषार फार
गंडवण्याची कला अपार
लगेच होतात शिरजोर
कुणी सापडते जेव्हा कमजोर
चमचम काजव्यांची भुरळ घालते
होत्याचे नव्हते होऊन जाते
पच्छाताप होतो फार मनाला
जेव्हा आपले पाऊल चुकते
कवयित्री गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा

