शिक्षणाचा वसा घेऊन
त्यांनी क्रांती घडविली
भिडेच्या वाड्यामध्ये
मुलींची शाळा काढली।।
कर्मठ समजाला तिचे
मान्य नव्हते शिक्षण
त्रास देऊन तिचे लोक
करु लागले शोषण।।
कोणत्याही त्रासाला कधी
घाबरली नाही सावित्री
अनेक दुष्ट प्रथांना मग
त्यांनीच लावली कात्री।।
जाता येता शाळेमध्ये
लोकांनी शेण फेकले
तरिही सावित्रीबाईनी
त्यांचे कधी नाही ऐकले।।
जिद्दीने आपल्या कार्याला
उत्साहाने चालूच ठेवले
मुलींच्या शिक्षणासाठी
तिने आपले जीवन वाहिले।।
सावित्रीबाईच्या कार्यामुळे
जीवनात सुख आले
सावित्रीबाई ज्योतिबानी
शिक्षण अजरामर केले।।
कवयित्री प्रा.समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

