करू संकल्प सूंदर
लावू झाडे पृथ्वीवर
सुखी होईल जीवन
नको ओझे त्याच्यावर।।
देतो निसर्ग सर्वच
अन्न पाणी व निवारा
त्याच्यासाठी हे मानवा
ठेव छान जग सारा।।
किती हे तूच मानवा
झाडे तोडत राहशी
नवी पिढी तुझी मग
येई मरनाच्या पाशी।।
बघ किती निसर्गाचे
नुकसान तूच केले
झाडे तोडून टाकली
सारे वैभव संपले।।
कशी राहील आपली
वसुंधरा सुरक्षित
केले आपण मरणा
खरोखर आरक्षित।।
ऑक्सिजन हा संपला
हवा झाली प्रदूषित
आले अनेक हे रोग
आता कोणी सुरक्षित।।
कर विचार मानवा
कर संकल्प हे नवे
तुझी वाचव ही पृथ्वी
हर्ष जीवनात हवे।।
कवयित्री प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर

