तिमिरा सोडून दुर देशा
अलगद येता उषा
हळद ऊन
कवेत घेवून
पाखरे गाती आली आली प्रभा
पुर्वेची दिशा
उधळी ललाट रेषा
गर्दतेज गवत कुरणे
सोनरंगी ती सुमने
जणू रंगांची भरली सभा
पहाटेचे क्षण बिलोरी
पाहुन होई तृण बावरी
डोंगर रानी
हिरवी धरणी
आतुर भेटण्या नभा
मिटलेल्या त्या कळ्या
फुलवी आपल्या पाकळ्या
गंधवेडा तो भ्रमर
हळूच येवून वेलीवर
शोधी फुलांचा गाभा
जलधारेचा छेडून तारा
तेजस्वप्न देवून अंबरा
जणू निशेला निरोप देण्या
आसमंत हा उभा
कवयित्री वैशाली वागरे – भुक्तरे
पालीनगर नांदेड

