प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – पैंजण
दुडू दुडू चाल
माझ्या चिमुकलीची
गोड गोड बोल
माझ्या सोनुलीची
नुकतीच लागली
ती चालायला
अवखळ चालत
लागली पडायला
घातले गं तिला
पैंजण पायात
मग मुद्दाम चाले
छुम छुम करत
चालण्याचा तिला
लागला चाळा
तिच्या चालण्याचा
आम्हाला लागला लळा
पैंजणाच्या घुंगराची
सवय...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मृदगंध
येता पावसाची सर
मृदगंध पसरतो
चिंब चिंब भिजवून
अंग अंग मोहरतो
ओल्या मातीचा सुवास
मृदगंध मितभाषी
रोमरोमी सामावून
एकरुप जीवनाशी
साहित्याच्या प्रांगणात
मृदगंध बहरतो
प्रतिभेला फुलवून
सुप्तगुण जागवतो
आंतरीक समाधान
मृदगंध जीवनाचा
आर्त हाक वेदनेची
ओघ वाहे भावनांचा
तुरे कर्तृत्व...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – जागतिक पर्यावरण दिन
जागतिक पर्यावरण दिनी
राखू निगा पर्यावरणाची
वृक्षरोपण करुन आम्ही
सुंदरता वाढवू सृष्टीची
राखू निगा पर्यावरणाची
जगू जीवन आनंदाने
झाडे लावू झाडे वाढवू
निसर्ग वाचवू संवर्धनाने
पर्यावरणाच्या रक्षणार्थ
झाडांचे तोडणे थांबवावे
झाडाची निगा राखून
आपले कर्तव्य...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – फुलपाखरू
रंगीबिरंगी सातरंगी मनमोहक असे हे फुलपाखरू किती दिवसाचे आयुष्य असेल त्याचे? फक्त चौदा दिवसाचे आयुष्य असते. या फुलावरून त्या फुलावर उडणारे असे मनमोहक पाखरू...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे होली निमित्ता विशेष कविता – नको चंद्र तारे
नको चंद्र तारे हवे रंग सारे
अश्या श्याम रंगात रंगून जाऊ
नको ती उदासी उराशी जराशी
कुणी मित्र शत्रू गळाभेट घेऊ
कशाला उगा भांडणे ती कुणाशी
पुन्हा सर्व नाती...
कविता – आई
आईची थोरवी
किती गावी
शब्द अपुरे
तिच्या ठायी
वात्सल्याची मूर्ती ती
करते अमाप माया
आपल्या मुलांवरी,
सदाच असते तिची छाया
मुलांस बरे नसताना
रात्र रात्र जागते
त्यांच्या उशाशी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन
श्रावण मासी नारळी पौर्णिमा
अर्पण होती श्रीफळ सागराशी
भावा बहिणीचं नातं दृढ होती
बांधीत रेशीम दोरा मनगटाशी
एकीला चार भावांचं बळ
तर एकीला एकही नाही
चार...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – माझी कविता
काय सांगू कविता माझी
कशी शब्दातून बोलते
अस्वस्थ मनातल्या भावना
हळुवार शब्दात मांडते
जे दिसते आजूबाजूला
सुख दुःख मनास भिडते
जसा येईल आकार
तसे कागदावर उतरते
कविता...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि...
महात्म्य ज्योतिबा फुले,
समतेचे होते आदर्श,
स्त्री शिक्षणाच्या बाबतीत,
जाणवला त्यांचा प्रकर्ष...१
क्रांतीसूर्य महात्मा फुले
लोकप्रिय व्यक्तिमत्व
लोकहितकारक होते
त्यांचे ज्ञान आणि तत्व.....२
सर्व जातिंयांना समान हक्क
मिळवण्यासाठी दिला लडा
दलित आणि इतर जातींना
पुढे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – जय शिवाजी जय शिवाजी
दऱ्याखोऱ्यातून आवाज घुमला, तोफ कडाडली
शिवनेरीवर जिजाऊ पुत्र जन्मला, राजा शिवाजी !
स्वराज्याचा नवा इतिहास,भवानीचा आशिर्वाद
बहुजनांचा आधार, श्री छत्रपती शिवाजी !
विजेसारखी तळपती तलवार हाती...










