आईची थोरवी
किती गावी
शब्द अपुरे
तिच्या ठायी
वात्सल्याची मूर्ती ती
करते अमाप माया
आपल्या मुलांवरी,
सदाच असते तिची छाया
मुलांस बरे नसताना
रात्र रात्र जागते
त्यांच्या उशाशी बसून
रात्री झोपतही नसते
सासरी गेलेल्या मुलीची
वाट बघत असते आई
माहेरपणास आलेल्या मुलीचे
लाड पूरवत असते आई
मी पण आहे एक बाई
आहे माझ्या लेकाची आई
आईपणाने वागताना तरी
वाटते एकदम भारी भारी
कवियत्री रेखा डायस
गोवा

